STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

मनाचिये गुंफी

मनाचिये गुंफी

1 min
748


मनाचिये गुंफी


मनाचिये गुंफी

शब्दांचा ताटवा

ह्रदयात फुलावा

कवीमनी


शब्दांची सुमने

भावना गुंफणे

काव्यात जगणे

नित्याचेच


काव्याचीच आस

लागली मनास

माझी सखी खास

काव्यसुधा


अंतरी जयाचा

वेध लागायाचा

ध्यास मनी त्याचा

पदोपदी


मनाचिये गुंफी

चित्त नाही ठायी

मन ओढ घेई

काव्यजगी


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational