मन ( अभंग रचना )
मन ( अभंग रचना )
1 min
7.2K
स्तब्ध या जलात I दगड मारावा ॥
तरंग उठावा I तो मनात ॥१॥
रात्रीची शांतता I धडधड उरी ॥
चाहुल ती जरी I अंधारात ॥२॥
भर दूपारात I तळपते उन ॥
भटकले मन | स्वैरभैर ॥३॥
घालमेल होई | जपायची किती ?॥
अनामिक भीती II रात्रंदिनी ॥४॥
मन असे साऱ्या I कल्पनांचे घर ॥
हो मळभ दूर I कायमचे ॥५॥