मला पुन्हा एकदा शाळेत जायच
मला पुन्हा एकदा शाळेत जायच
सकाळी उठून शाळेचा पोशाक घालायचा।
शाळेत गेल्यावर मोठ्या आवाजात छान राष्ट्रगीत आणि भारत माझा देश आहे ही प्रार्थना म्हणायची।
ते झाल्यावर उड्या मारत वर्गात जाऊन बसायचं
मला पुन्हा एकदा शाळेत जायचं।
नव्या कोऱ्या वहीला कव्हर लावायचं।
सुंदर अक्षरात पहिल्या पानावर माझ नाव टाकायचं।
शाळेतल्या फळ्यावर छान छान सुविचार लिहायचे।
काही समजलं नाही ते परत परत विचारायचं।
मला पुन्हा एकदा शाळेत जायचं।
शाळेत जाताना बोर चिंचा कंपास पेटीत लपून ठेवायची।
बघितल कुणी तर सगळीच रिकामी करायची।
मधल्या सुट्टीत आईच्या हातची आयती पोळी भाजी पोटभर जेवायचं।
मला पुन्हा एकदा शाळेत जायचं।
कधी कधी वाटत जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा ते दप्तराच ओझ चांगलं होत।
समजदारीन वागण्यापेक्षा घरच्यांवर रुसणं फुगण चांगलं होत।
घरी आल्यावर दप्तर फेकून मनमुराद मैत्रनिशी गप्पा मारन चांगलं होत।
Home work झाला नाही तर वही घरी राहिली म्हणून बहाणे सांगणं चांगलं होत।
दडपणाच्या ओझ्याखाली जगण्यापेक्षा मनमुराद हसन चांगलं होत।
आईच्या हातानी केस ओढून ओढून सरळ बघ म्हणून दोन वेण्या घालून लाल रिबीन लावणं चांगलं होत।
तेलाने मालिश करता करता डुकली येन चांगलं होत।
आणि कधी कधी डोक्यात हळुवार मारलेली चापट खाण चांगलं होत।
या सगळ्या आठवणी आल्या आणि मला पुन्हा शाळेत जावस वाटलं।
पण गेले ते दिवस म्हणून मी माझ्या आठवणींना तुमच्यासोबत वाचनासाठी पाठवलं।
मला पुन्हा शाळेत जावसं वाटलं
