वीरांचे बलिदान
वीरांचे बलिदान
1 min
5
देश भारत माझा
इथे जन्मलेच वीर
करी रक्षण मातेचे
मना सर्वांच्या तो धीर ---१
बलिदान वीरांचे हे
देशासाठी अनमोल
प्राण दिले कित्येकांनी
ओठी भारतमाता बोल ---२
दिली प्राणांची आहुती
वीर मरण हो आले
देशासाठी लढले ते
शूर वीर तेच झाले ---३
इतिहासी नोंद त्यांची
असे कर्तव्य अपार
सुख दिले जनतेला
आम्ही मानतो आभार --४
बलिदान वीरांचे हे
गेले नाही असे वाया
तिरंग्यात त्यांचीच ती
सजलीच होती काया ---५
