घन ओथंबून येती
घन ओथंबून येती
1 min
14
घन ओथंबून येती
सुटे मातीला सुगंध
पक्षी झाडावर बसे
फांदी हले मंद मंद ----१
येता पावसाचे थेंब
सप्तरंग हे आकाशी
पिले घरट्यात असे
आई जाते पिलापाशी ---२
होई कडकडाट तो
वीज देई तो प्रकाश
नभातून सडा पडे
रिते होतेच आकाश --४
ऊन पावसाची ये जा
चाले दररोज खेळ
रान होई ओले चिंब
मोर नाचे थोडा वेळ --५
