STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

सरी श्रावणाच्या

सरी श्रावणाच्या

1 min
9

सरी येता श्रावणाच्या

पडतात हळुवार

थंड असा तोच वारा 

वाटतसे गार गार ---१


रिमझिम पावसात 

वनराई ही दाटते 

शालू हिरवा घालून

वसुंधरा ही नटते --२


आकाशात स्वच्छंद हे

उडतात छान पक्षी

एका ओळीत सुंदर

मनोहर दिसे नक्षी ---३


उभ्या जगाचा पोशिंदा

मुखावर त्या आनंद

काळ्या मातीचा छान

दरवळे हा सुगंध ---४


  इंद्रधनु सप्तरंग

 दिसे कोणत्याही क्षणी

 मोर नाचे थुई थुई 

होई आनंदच मनी ---५


असा हा श्रावणमास

 ह्याच मासी सणवार

राखी पौर्णिमेच्या सणा 

भाऊराया हो नेणार ---६


Rate this content
Log in