STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

बीज अंकुरे अंकुरे

बीज अंकुरे अंकुरे

1 min
10

माती न्हाती धुती होते


बीज अंकुरे अंकुरे 

ओल्या मातीच्या कुशीत

वनराई हिरवळ

वसुंधरा खुशीत ---१


उभ्या जगाचा पोशिंदा

खुश राजा शेतकरी 

रूप साजिरे पाहून

दाटे आनंद तो उरी ---२


बीज डोले वाऱ्यावरी 

स्वप्न हिरवे ते डोळा

शालू घालुनी हिरवा

काय वर्णावा सोहळा --३


गेमायभू ही वाढवी

कुशी आपल्या ती बीज

पर्वा न करती कधी

असे वारा, पाणी, वीज --४


सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर


Rate this content
Log in