STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

स्वातंत्र्याची पहाट

स्वातंत्र्याची पहाट

1 min
6

भारत देश स्वातंत्र्यासाठी

 क्रांतिवीरांनी दिली आहुती 

घरदार सोडून, स्वप्न त्यांचे

 स्वातंत्र्यासाठी तळमळ किती --१


 देशासाठी लढले ते 

स्वातंत्र्याची पहाट झाली 

फासा वरती चढले कोणी 

आठवणीत सर्वांच्या राहीली --२


राष्ट्रगीत गाऊन आपले 

देशभक्तीची गाऊ गाणी

 राष्ट्रध्वज फडकवताना 

किती अभिमान वाटे मनी ----३


जे देशासाठी लढले 

अमर हुतात्मे झाले

 लढले भारत स्वातंत्र्यासाठी

 त्यांच्या नाव इतिहासात कोरले---४


तिरंगा भारताची शान

आम्ही अभिमानाने फडकवितो

राष्ट्रगीत हे भारताचे आम्ही

सर्व मिळून आदराने गातो ---५


Rate this content
Log in