मकर संक्रांती निमित्त साऱ्याले.
मकर संक्रांती निमित्त साऱ्याले.
सुकोमल भासले ,
कोवळेच किरण
अंगी लटका राग तिचा
ते कुंकवाचे गोंदन
उठते भल्या सकाळी
करते सडा सारवण
घर भासते स्वर्ग अन
सखी माझी सौदर्यबन
पक्षी उडाले गारव्यात
चिमणीची ती चिवचिव
नवेच भासले जग
झाडाची हिरवी लव
बोल घेवळे बोलने
घरातल्या बालिकेचे
वाटते चांदणे फिके
अंगणी अशी ती नाचे
सकाळ च्या प्रहरी
मीठी मारुन ती बोलली
मकर संक्रांत सख्या
नववर्षाची सुरुवात झाली
विसरून सारे भेद
सारे सुखाने नांदु
तीळ गुळ वाटू अन
मित्र प्रेमाने बांधू
