STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

मी...!

मी...!

1 min
27.6K


मी कोण

हे मला नाही कळलं

जीवन अस

वळण घेऊन वळलं


समज येता

समजत गेलं

समजता समजता

उमजत गेलं


जीवन अस

फुलत गेलं

फुलता फुलता

गुंतत गेलं


इतकं कळलं

अस का वळलं

जे मला

कधीच नाही समजलं


तडजोड

अपरिहार्य ठरली

पर्यायाच्या शोधात

गुरुकिल्ली गवसली


सुखा साठीची

भटकंती थांबली

आशेची जेंव्हा

दोरी तुटली


सोशिकतेची गट्टी

कायमची जमली

जेंव्हा माझी

मला किंमत कळली


जीवनाने मला

इतकं ज्ञान दिलं

आपेक्षांचं भूत

कायमच निघून गेलं....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational