STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

3  

Trupti Naware

Inspirational

मी प्रयत्नात आहे

मी प्रयत्नात आहे

1 min
818


आधाराचा नको हात आता देवू

मला माझे खंबीर होता आले आहे

सावलीत पाठलाग ,नको खेळ खेळू

पाठमोरी वळणे आता विसरले आहे

शब्द इतके सजग झाले की,

त्यांच्यावरच आता राहिला विश्वास आहे

कल्पना तर माझी तरल आणि संथ

त्यातही तुझे डोकावणे साहजिकच आहे

आता व्यत्ययापरी नको वाटेत येवू

मातीत उभारले मी नवे झाड आहे

अनोळखी पाश हे मुक्त करून घेवू...

गाठी उकलणेही कठीण जात आहे

आता वेडावल्या वसंताला भेटू

पानगळही भावगीत जुनेच गात आहे

आता जुनी ओळख नकोच दाखवू

मी नव्यानं ओळखण्याच्या प्रयत्नात आहे .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational