मी नव्या युगाची आशा
मी नव्या युगाची आशा
तमोमय अंधःकार
पसरला सभोवती होता
रांधा वाढा उष्टीकाढा
हाच वसा मज होता (1)
शिक्षणाने बदलले
माझ्या भवतीचे विश्व
ज्योतिबा नि सावित्रींनी
केले मजला आश्वस्त (2)
बुद्धिचातुर्याने मीच
समतेस सिद्ध केले
सर्व क्षेत्रे जिंकूनिया
वर्चस्वही सिद्धकेले (3)
नवनवी कार्यक्षेत्रे
झाली कर्तृत्वास खुली
भूदलाचे रणांगण
अवकाश पाणबुडी (4)
मार्गातील कंटकांस
फटकारे उडविले
स्थान ज्याचे त्याला
त्वरे दाखवुनी दिले (5)
नव्या युगी नववाटा
मज आव्हाने दाविती
क्षितीजही माझे आता
विस्तारुनी उभारती (5)
नव्या युगाची ललना
कार्यक्षम नारी आता
नवयुग लाभे मला
नव्या युगाची मी आशा ( 6)
