मी कुठे लिहीते अवघड...
मी कुठे लिहीते अवघड...
मी कुठे लिहिते अवघडं ,
एवढे तुला कळायला हवं ,
जे दिलं तू वाट्याला ,
तेच तुला वाचायला हवं ...
तुला वाचूनही कुठे कळलं ,
हे दुःख माझे की ,
तुझ्यात ना प्रेम उरलं ,
मनाने मनाचं अंतर कायम ठेवलं ...
सोबती चालायचं कसं? ,
सारच कसं अवघडलं ,
प्रेमाचं पाझरण कधीच सुकलं ,
मनाला चिरे पण वरवर ,
सगळं कसं नीट दिसलं ...

