मी अंतराळवीर
मी अंतराळवीर
मी आहे अंतराळवीर
सगळे म्हणती मझ शूरवीर
जाईन मी मंगळावर
शोधायला पाणी त्यावर
चांदोमामाचा वाडा पाहायला
जाईन मी चंद्रावर
यानात बसून जाईन
पृथ्वीला प्रदक्षिणा मारीन
निळाशार पृथ्वी पाहून
आईची आठवण येईल
यान घराकडे फिरवून
आईच्या कुशीत झोपीन.
