आई
आई
आई घरात असते तेव्हा
एक वेगळं चैतन्य असते.
ती घरी नसताना कशी
तुळस ही अंगणात रुसून बसते.
आई जास्त नाही शिकली तरी
तिला चेहरा कसा वाचता येतो ?
कुठून शिकली ही विद्या
मनातला विचार खरा ठरतो.
आई असता घरी
घराचे गोकूळ होई.
आईच्या मायेची जादू
काट्यांचे फूल होई.
एक भाकरी तिच्या हाताची
पोटाची भूक शांत होई
किती ही खावा बाहेरचे
आईच्या चवीस तोड नाही.
कुणी म्हणे नकोस संभाळू आईस
पाठव तीस तू वृद्धाश्रमी
देवा त्यांच्या आईवर न येवो
वेळ वृद्धाश्रमात राहायची.
कित्येक जण विचारती मझ
आई कुठे? राहते का तुझ्याकडे
मी म्हणतो, " नाही नाही"
मीच राहतो आईकडे, आईकडे.
