चला गावाकडे
चला गावाकडे
1 min
245
चला गड्यांनोखेड्याकडे वळा जरा
कारण आपला गाव बरा
गावाकडे आहे आपली काळी माती
शहरात किती सिमेंटच्या इमारती
गावात झाडांतून जाते पायवाट
शहरात लोकांची उसळली लाट
शांत निवांत विसावू गावाकडे
दगदग धावपळ किती शहराकडे
गावाकडे आहे आपली माणसे
शहराकडे कोण विचारणार नाही फारसे
म्हणूनच चला आपल्या गावाकडे
वाट पाहणाऱ्या त्या घराकडे
