रेसिंग कार
रेसिंग कार
मी घेईन एक कार
ती असेल वेगवान
मला कारची आवड न्यारी
पिवळा रंग, दिसे भारी
एक स्वप्न आहे माझे
कार रेसिंग खेळायचे
पहिला नंबर आणून
देशाचे नाव गाजवायचे.
भरपूर मिळतील मग
मला रेसिंग कार
सुवर्ण पदकांचा
माझ्या गळ्यात हार.
