साथ जन्मोजन्मीची
साथ जन्मोजन्मीची
साथ तुझी लाभली जीवनी या
फुलले क्षण आयुष्याचे कळीसम या
आलीस माझ्या जीवनी उंबरठा ओलांडूनी
पैलतीरी संसाराची नाव आता चालली
कित्येक वादळे संसारनौकेस आदळले.
तुझ्या प्रीतीने त्यांस थोपवले.
अशीच साथ मी ही देईन तुला.
सोडून जावू नकोस वचन दे मला

