STORYMIRROR

चिंतामणी मोघे.

Others

2  

चिंतामणी मोघे.

Others

शेतकरी मी

शेतकरी मी

1 min
26

चला जावू शेतामध्ये

काळी काळी माझी आई

झुंजूमुंजू झाल्यावर 

झाली जाण्यासाठी घाई


सर्जा राजा दोघांची जोडी

त्यांना किती कामाची गोडी

गाळू रानात घाम

मगच मिळेल रे दाम


करू कष्ट अपार

शेत होई हिरवेगार

कुणब्याचा मी पोर

वाटत नाही कष्टाचा भार


कष्टमय माझे जीवन

फुलवतो मी नंदनवन

अंकुरता बीज मातीत

कष्टाच होई सोनं 


Rate this content
Log in