Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Shidore

Children Stories

3  

Varsha Shidore

Children Stories

बालपण जगू या पुन्हा...

बालपण जगू या पुन्हा...

1 min
273


खोल रुजलेल्या मनाच्या कोपऱ्यात 

ऐकता खट्याळ कुजबुज क्षणोक्षणी 

व्याकुळतेने न्याहाळणं वेळोवेळी

बालपणीच्या कडू-गोड आठवणी... १


छोट्याशा खाऊतलं प्रेम वाढलं 

फक्त सर्वांसोबत वाटून खाण्याने 

आसवांचा मनसोक्त धो-धो पाऊस 

भरभरून लुटला आनंदी हट्टाने... २


खेळांतल्या गंमती जंमतीतलं 

लपाछपीचं कोडं आपोआप सुटलं 

लपवालपवीचं राज्य न येताच 

भांडणांचं सत्र न खेचता मिटलं... ३


हरवलेलं रूसवं-फुगवं बालपण 

पुन्हा कधी येईल आता वाट्याला

मिळालेला अवधी नको दवडायला 

गवसलेलं नवं कोडं सुटायला... ४


पुन्हा एकदा बालपण जगायला 

भरू जोमाने होकाराचे बेभान वारे

मिळून दंगा मस्तीचे गिरवू धडे 

चला होऊ आज लहान सारे... ५


Rate this content
Log in