चला होऊ लहान सारे
चला होऊ लहान सारे
1 min
438
चला होऊ लहान सारे
बाजूला ठेवू थोरपण आपुले
देऊ उजाळा बाल मनाला
मागू लहानपण आपुले…… 1
घेऊन मुलांची खेळणी
खेळू आपण भातुकली
लावू लग्न बाहुली चे
मिसळून आपण मुलांमधे …...2
मुक्त करू साऱ्या भावना
जे न मिळाले मज बालपणी
ते सर्व देऊ आपल्या मुलांना
मौज करू बालपणीची …...3
मुलांसवे खेळता कॅरम
करू आपण कट्टी बट्टी
भांडू आपण क्वीन साठी
होऊ आपण एकदम हट्टी ……..4
होऊन आज बाळ मनीचे
विसरू सारे भेद जगाचे
चला होऊ लहान सारे
करू बालमन ताजे …...5
