STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Fantasy

1.7  

Prashant Shinde

Drama Fantasy

मी आणि माझी कविता..!

मी आणि माझी कविता..!

1 min
14.4K


मी माझ्यावरच

कविता लिहायचं ठरवलं

पहिल्या झटक्यात

पेनाच डोकं फिरलं

बहुतेक रुसल असावं

म्हणून साफ सफाई केली

झटका मारला

वेडी वाकडी मेहनत घेतली


पुन्हा झटका मारला

निब वर बोट फिरवलं

नवीन कागदावर

प्रयत्न केला

पण काहीच

उपयोग झाला नाही


तुम्हाला वाटेल

मला वाईट वाटलं

पण तस काही झालं नाही

तीच दुर्भाग्य हे

तिला माझ्यासाठी

झिजता आलं नाही


ती हसली आणि इतकंच म्हणाली

लिहिण्यासारखं बरंच आहे

पण लिहायचं कशाला

इथं वाचणार कोण आहे..?


प्रत्येक जण लिहिणाराच

आणि बदा बदा

ढीग रचणारा

स्वतः ची जाहिरात बाजी करणारा


तू मुक्त जीवन जगतोस

हे कोणाला तरी रुचेल का?

डोळ्यातलं कुसळ

शोधणारी जमात

अवती भवती असताना

न लिहिलेलंच बरं

म्हणून मी रुसले फुगले आणि

गप्प बसले...


पटलं मला तीच म्हणणं

आणि

दुसऱ्याच्या डोळ्यातलं

मुसळ दिसायचं

बंद होईपर्यंत

वाट पहायचं ठरवलं


ज्या दिवशी हे अंधत्व मला लाभेल

आणि माझ्या डोळ्यातलं

कुसळ सुद्धा स्पष्ट दिसण्याची

दृष्टी मला लाभेल

तेव्हाच पहिली माझ्यावरची

कविता लिहीन

असा संकल्प आज मी केला

खर सांगू ,खूप बरे वाटले

एक पाऊल पुढे पडले....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama