म्हणून इथे लग्न करतात
म्हणून इथे लग्न करतात
घरात कोणी काम करायला नाही
म्हणून इथे लग्न करतात
आणि त्या मुलीच्या स्वप्नांना
भांडी कपडे केरसुणीत
भग्न करतात || 0 ||
मनात नवी कोवळी स्वप्नं घेऊन
येते ती सून आणि
नवरी बनून
सर्वांचा आदर सत्कार करते ती
लाजेने कावरी
बावरी बनून
विवाहाच्या वेळी तिला सारे
सुखस्वप्नात मग्न करतात
आणि त्या मुलीच्या स्वप्नांना
भांडी कपडे केरसुणीत
भग्न करतात || 1 ||
बायको हवी ऐश्वर्या सारखी
पण तिने घरात कामवाली
बाई बनावं
जॉईंट फॅमिली च्या गर्दीत
दिरांच्या पोराची कायम
दाई बनावं
जरा विसावा देत नाही तिला
जीवन जणू विघ्न करतात
आणि त्या मुलीच्या स्वप्नांना
भांडी कपडे केरसुणीत
भग्न करतात || 2 ||
