महिला दिन
महिला दिन
एकच दिन
असा समारंभ
कौतुक आरंभ
महिला दिन ....
तिचे कर्तृत्व
किती कौतुकाचे
धडे ते प्रेमाचे
तिचेच स्वत्व ....
आईचे रूप
संस्कृती आधार
आयुष्या आकार
प्रेम स्वरूप ....
उभी ठाकते
पतीच्याच पाठी
आयुष्याच्या गाठी
घट्ट जोडते ....
मुला बाळांचे
करी संगोपन
जपे मातृधन
त्या संस्कारांचे ....
घेई भरारी
उभी पायावर
घेई शिरावर
जबाबदारी ....
प्रत्येक क्षेत्र
स्थान उंचावले
पाऊल रोवले
दिपती नेत्र ....
रणरागिणी
मोठे ते कर्तृत्व
जपते मातृत्व
एक संगिनी ....
घेई शिक्षण
विद्या विभूषीत
पदे भूषवीत
वेचते कण ....