म्हाये माय
म्हाये माय
लाडाया माय ना मी तुया
कैय ताऱ्यांन भली लपून
तूयाविना करमं नय ना मला
थकलो ना मी तुयी वाट पाहून
माय तूये मायेचा पदर
गेला उडून कवा अंबरी
आता कोण लाड करील मला
तुया मायेविना मी भिकारी
निजव्या वाटंय कुशीन तुह्या
कवा ऐकला याव्याह अंगाई कानी
बिजे कोणायी माय बघलं त
आठवणींन डोळयांन येत पाणी
कैय रेतं तू हांग ना ग मला
कैय शोधू तुला म्हाये माय
जवा रातशे उपाशी निजतो
विशारणारं कोणीच जवल नय
कोण फिरविन मायेनं हात
कोन ग भरविन मला घास
तुया शिवाय ग म्हाये माय
म्हाया जीवन झालं ग भकास
कवा येशी फिरून मंघारी
रात्रीचे डोळ्याला निज नय
तुया शिवाय मी एकटा पडलो
वार ना मलावं माय तुये तय....
तुया- तुझा.
हांग - सांग...कैय- कुठे
भली- बसली कवा-कधी
निजव्या- झोपावं
करमं- करमत
बिजे - दुसऱ्या
म्हाये - माझे
रेतं - राहते
रातशे - रात्रीला
विशारणारं - विचारणारं
जवल - जवळ
मंघारी - माघारी
वार - बोलव, बोलावणे
मलावं - मला
तय - तिथे
