महाराष्ट्राच्या कौतुकात…
महाराष्ट्राच्या कौतुकात…
ऐकावे याला ते
पुण्य त्या कानांचे,
पाहावे याला ते
नशीब त्या डोळ्यांचे
संस्कार मराठीचे आमच्या
कणाकणात रूजू दे,
तोरण तिच्या संस्कृतीचे
दारात नेहमी सजू दे
याच मराठी मातीत जन्मला
शिवबा राजा मनाचा,
शाबुत ठेवला पदर त्यांनी
आयाबहिणींच्या डोईचा
जिजाऊंनी घडविले त्यांना
लावून मस्तकी टिळा मराठी मातीचा,
म्हणूनच झाले मानकरी
इतिहासातील सुवर्णपानांचा
पदस्पर्शाने पावन झाली
ही भूमी संतमहात्म्यांच्या,
अभंगांची शिदोरी घेतली ठेवून
आठवण
ींत ज्ञानोबा तुकोबांच्या
समानतेची शिकवण दिली
नाही गर्व मी पणाचा,
होता फक्त ध्यास एक
माणसाला माणसात आणण्याचा
दारात ऐटीत
तुळशी माई डोलते,
स्वागतास पाहुण्यांच्या
सडारांगोळीही सजते
नसला आधार जरी
त्याच्या पोटाला कणभर,
पाहुणा मात्र हमखास
देतो समाधानाची ढेकर
मायेत ओलावा याच्या
जणू फुटावा अंकुर,
महानतेची गाथा याच्या
पसरावी सर्वदूर
कौतुकात आज याच्या
शब्द उरले नाही,
नाव असणे मुखात याचे
यापरीस सुख दुसरे नाही