महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
राज्य मराठी असे आमचे
देशाची असे शान
महाराष्ट्राच्या मातीचा
वाटे आम्हा अभिमान
शिवरायांची पावनभूमी
इथे स्त्रियांना मिळेल मान
प्रत्येक मावळा असे इथे
ठेवून मनात याची जाण
संत महात्म्यांच्या वाणीने
लाभला वारसा मराठीचा
हृदयात अधिष्ठान असे
गजर करीतो मराठीचा
ज्वलंत इतिहास वर्निते
गडकिल्ल्यांचे राज्य
रांगडे इथले मावळे पाहता
ताठ उभे हिंदवी स्वराज्य
