महामानव
महामानव
भुकेल्यास देतो अन्न , दुर्बलांस धीर
आंधळ्याची काठी होतो , तोच खरा थोर (1)
जीवनात ध्येय त्याचे , सेवाभाव हेच
संकटात धाव घेई , पांडुरंग तोच (2)
स्वार्थाचा ना लवलेश , नसे गाजावाजा
दुखल्याखुपल्यांसाठी , दिलदार राजा (3)
सर्वजण समानच , नाही कधी भेदभाव
सर्वांसाठी नित्य धावे , मनी बंधुभाव (4)
नाव ना कुठे छापतो , नसे प्रसिद्धीत
चित्रगुप्त करी नोंद , तयाच्या खात्यात (5)
माणुसकी हाच भाव , भाबड्या मनात
परमेश नित्य वसे , पवित्र कार्यात (6)
देई आशिर्वच दुवे , रंजला गांजला
लागे आयुष्य सार्थकी , मोक्षप्राप्ती त्याला
