मैत्री
मैत्री
घट्ट झाली होती आमची मैत्री
साऱ्यांनाच पटली होती आता खात्री
अडचणीत एकमेकांना साथ द्यायची
जबाबदारी आपुलकीने स्वीकारायची
चहाची मैफिल जमायची
गप्पांना तर सीमाच नसायची
सगळ्यांनी मिळून कोठेतरी भटकायचं
निसर्गाच्या कुशीत रममाण व्हायचं
गुंफतच गेली प्रेमाची साखळी
जणू परमेश्वराची भेटच आगळी
