STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Inspirational

3  

Gaurav Daware

Drama Inspirational

मैत्री अलंकारी...

मैत्री अलंकारी...

1 min
253

प्रत्येकांची मैत्री असतें लय लय भारी

कित्येकजण मानतात मैत्री समोर हारी

पण या मैत्रीची काही बातच न्यारी

म्हणून या मैत्रीचे आम्ही अहो कैवारी


अनेकजण मैत्रीत असतात अलंकारी

कलेच्या जोरावर ते बनतात कलाकारी

पण मैत्री नाही पाहत जात धर्म सारी

म्हणून मैत्री हे नात या जगात चमत्कारी


कित्येकांची मैत्री तर फक्त फायदा भारी

फायदा असेल त्यात तर बनतात अवतारी

पण मैत्रीच्या नात्यात असते सुखं मात्र सारी

म्हणून अनेक धनवान मैत्री विसरत नाही अलवारी


खरच मैत्रीच्या नात्याची काही बातच प्यारी

रागात रुसत बनतात काही मित्र ललकारी

पण मित्रावर संकट येताच धाव घेतात सारी

काही करतात मारामाऱ्या मित्रासाठी भारी


मैत्री खरंतर परीक्षा असते साक्षीदारी

नसतो त्यात लोभ अन कुठले उपकारी

त्यात असते प्रेम अन थोडया शिव्या मात्र भारी

म्हणून मैत्रीच नात थोडं असत अविष्कारी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama