STORYMIRROR

AnjalI Butley

Classics

3  

AnjalI Butley

Classics

मैत्र

मैत्र

1 min
224


जलमय झालेल्या मुंबापुरीत 

कसेबसे संध्याकाळी अंधारात घरी पोहचले तेंव्हा

नविनच ओळख झालेल्या शेजारच्या काकू

हातात गरमा गरम बटाटे वडे घेऊन 

वाट बघत उभ्या होत्या दारात...


पहिले हे खाऊन घे

शांत झाले की बोलु...


काळजीने कोणी आपलं म्हणुन बोलल्याने

मन गेले गहीवरून...


आमचा लॅडलाईन फोन चालू आहे

घरी गावाला फोन आईला कर..

सांग मी सुखरूप आहे

काळजी नको करू...


पावसाने केलेल्या एवढ्या नुकसानीची

कल्पना नव्हती आली तेंव्हा...


टिव्ही, रेडिओवरच्या बातम्या कानी पडल्या नव्हत्या मुळी...


नंतर जेंव्हा कळले तेंव्हा

मुंबापुरीत काळजी करणार 

आपल म्हणणार कोणी भेटले म्हणोनी

मनोमनी आभार माणले देवाचे

व नव मैत्र जडल काकूंशी...


गडगडाट, लख लखाट ढगांन मधे झाल्यावर

मुसळधार पाऊस पडल्यावर

आठवण होते मैत्राचे व

रस्ता शोधत गुडघाभर पाण्यातुन चालत 

पुर्ण भिजत अंधारात घरी सुखरूप कसे पोहचले याचे

व काकूंचे ते गरमा गरम बटाटे वडे घेऊन स्वागत करण्याचे...


मग हमखास जोतो काकूंना एक फोन 

आठवण काढत गप्पा करत

मैत्र घट्ट होत जात वर्षानु वर्ष...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics