मायेचा झरा
मायेचा झरा
प्रिय आईस,
अंकुरला गर्भातून तुझ्या
सानुला एक जीव
अवघे विश्व दाविण्या
तू नाही ठेवली उणीव !!१!!
माझ्या बंद डोळ्यांनीच तेव्हा
सारे विश्व पाहीले
तळहातावरच माझे
स्वप्न फुलत राहिले !!२!!
तुझ्या स्पर्शाची ऊब
जेव्हा मला मिळाली
तुझ्या त्यागाची महती
तेव्हाच मला कळाली !!३!!
तुझं सारं सुख
तू माझ्यातच पाहिलं
मला मोठं करता करता
तुझं जगायचच राहिलं !!४!!
मला कुशीत घेऊन
तू आभाळाखाली निजली
कष्टीली काया तुझी
घामाच्या धारांनी भिजली !!५!!
मला अमृत पाजून
तू उपाशी राहिली
तुझी जगण्याची धडपड
आत्ता मी पाहिली !!६!!
