मातीच्या कुशीत
मातीच्या कुशीत
( सहाक्षरी )
मातीच्या कुशीत
वांझपण नाही
अंकुरते सारे
भेदभाव नाही.....१
घराचा तो पाया
आधार मातीचा
जरी लाल वीटा
काळ्याच मातीच्या....२
मातीत खेळता
बालपण सरे
मातीच्या गंधात
यौवन ही फुले.....३
मातीचा तो टीळा
कपाळी लावता
दैवत मिळती
जीवाची धन्यता.....४
