माँ
माँ
जय माँ काली,
दुष्टाचा, नायनाट,
करणाारी तू, माँ,
इंद्रदेव, वायूदेव,
वाढला होता अहंकार
कसा केलास अहंकार चुरचुर माँ
तू आमची माँ
आम्ही तुझ्या लेकी गं माँ
आमची शक्ती तू माँ,
छिन्न्नमस्ता, तू श्रीविद्या,
भुवनेश्वर तू, भैरवी तू,
दुर्गा तू लक्ष्मी तू,
अनेक नावे
अनेक रूप तुझे माँ
शक्तीचं प्रतीक तू माँ
जन्म तू मृत्यू तू माँ
माँ तुझ्या लेकी आम्ही गं
येथे होतो अपमान आमचा माँ
तुला नऊ दिवस पूजतात माँ
तुझं रूप असते म्हणे
आमच्यात
मग
आम्हाला का गं छेडतात
लोक,,,,
प्रभावती संदिप वडवळे नांदेडकर
