मामाचे गाव
मामाचे गाव
झुकझुक गाडीत बसू या
मामाच्या गावाला जाऊ या !!धृ!!
मामाचा वाडा चिरेबंदी
सोनकुसरीच्या गावामधी
गम्मत जमत खूप करू या
मामाच्या गावाला जाऊ या..
मामा मोठा तालेवार
गावातला तो सावकार
मामाला आवडी सांगू या
मामाच्या गावाला जाऊ या
मामाचे शेत शिवारात
आंब्याच्या अंमराइत
आंबे खायला जाऊ या
मामाच्या गावाला जाऊ या..
आजीआजोबाचा लाडका
त्याच्या पुढे असतो हेका
मौजमस्ती खूप करू या
मामाच्या गावाला जाऊ या..
