STORYMIRROR

Sanjay Gurav

Fantasy

3  

Sanjay Gurav

Fantasy

माझी सायकल

माझी सायकल

1 min
12K

काल स्वप्नात आली माझी सायकल प्यारी

होते जडलेले पंख तिला जणू काही परी.


तिच्यावर जीव माझा जडला होता भारी

सगळ्या जगाहून वेगळी होती आमची यारी.


पुन्हा झालो लहान केली तिच्यावर मग स्वारी

आख्ख्या दुनियेची सफर क्षणात केली पूरी.


नसली महाग तरीही पंखात तिच्या आहे जवाहिरी

झेपावते अवकाशात तेव्हा दिसते बघा सोनेरी.


आज गाडी दिमतीला तरी कुठे अशी सवारी?

आकांक्षाचे पंख आणि तिची ऐट किती न्यारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy