STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Children Classics

3  

SURYAKANT MAJALKAR

Children Classics

माझी छकुली

माझी छकुली

1 min
15K


ईवले ईवले डोळे तुझे

ईवले ईवले कान

हो-हो म्हणते, ना-ना म्हणते,

डोलवित आपली मान


हम्मा हवी, तुतू हवा

हवी हिला माऊ

बोट दाखवी दाराकडे

सांगी बाहेर जाऊ


चॉकलेट नको, गोळी नको

नको हिला बिस्किट

कुरकुरे, लेर्यस मात्र

खाते डोळे मिचकावीत


खेळण्यातल्या कपामधुन

खोट खोट चहा देते

देते कसली देता-देता

तोच हात मागे नेते


दुडुदुडु पळताना

घर अपुरे पडते,

खरं खरं पडताना,

कधी खोटच 'पयली' म्हणते


दीदी हवी, दादा हवा,

हवी हीला ताई,

पप्पाच्या पाठीवर घोडा,

पापा दयायला आई


अशी माझी छकुली

कधी कधी खुप रडते,

काय हवे, काय नको

काहीच न समजते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children