माझी आई...
माझी आई...
अगं अगं आई
थांब ना गं बाई
कामं तुझी कधी
संपतच नाही
सकाळी उठते
अंगण झाडते
बागेला पाणीही
तू बाई घालते
आंघोळपांघोळ
देवाचीही पूजा
तरी सुद्धा तुझा
नाही गाजावाजा
स्वयंपाक छान
तू करते सारा
जेवणा नंतर
आवरी पसारा
आवरा आवरी
मग भांडीधुणी
तरीही कौतुक
का करेना कुणी
अभ्यासही घेते
म्हणते अंगाई
भारी आवडते
मला माझी आई
