STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Comedy

3  

Samiksha Jamkhedkar

Comedy

माझे डायट आहे सुरु🙏

माझे डायट आहे सुरु🙏

1 min
441

आग्रह नका करू माझं डाएट आहे सुरु

सकाळी उठल्यावर एक कप चहा

त्याच्यसोबत चार पाच बिस्कीट असते पहा।

थोडे काम करून झाल्यावर मूल म्हणतात आई कांदे पोहे हा नाश्ता कर।

मग मीही खाते डिशभर।

परत वाटते काम थोड आवरू।

आग्रह नका करू माझं डाएट आहे सुरु।

आता वाजला एक झाली जेवायची वेळ।

भात वरण भाजी पोळी आणि खिरीचा जमला मेळ।

आता झाली थोडी आरामाची वेळ

उठल्यावर म्हणे करशील का आता थोडी भेळ।

भेळ करता करता एक घास चव मी घेतली।

आवडली म्हणून सगळीच मी फस्त केली।

खाल्यावर वाटत आता थोडं फिरू।

आग्रह नका करू माझं डायट आहे सुरु।

संध्याकाळचा स्वयंपाक आता काय करायचा।

पाऊस छान पडतो आहे बेत गरम खिचडी भजेचा ।

तेलकट तेलकट नको म्हणून गेलेच की प्लेटभर।

जेवण संपल्यावर उरली चार पाच

म्हंटल बाई मोल महागच वाया कस घालू।

आग्रह नका करू माझं डायट आहे चालू।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy