STORYMIRROR

AnjalI Butley

Fantasy

2  

AnjalI Butley

Fantasy

माझा सुखी माणसाचा सदरा

माझा सुखी माणसाचा सदरा

1 min
471

माझा सुखी माणसाचा सदरा

सग्यासोयर्याना आवडला खुप

हवा होता तो त्यांना आपल्यासाठी


असुयेच्या भावनांनी घेरले होते ते

मैत्रीचे कोंडाळे करूनी

फिरत राहीले माझ्या अवतीभवती


मैत्री-मैत्री करत

ओरबाडत फाडत गेले 

माझा सुखी माणसाचा सदरा


फाडत गेलेल्या

माझ्या सदर्याच्या

झाल्या होत्या चिंध्या


झालेल्या चिंध्या पाहून

हसत होते, खिदळत होते

होते घेत आनंद त्याचा


मन माझे सांगत होते मला

श्रीकृष्णाने द्रोपदीला दिलेल्या साडीसारखा

आहे तुझा सुखी माणसाचा सदरा


सतत नवनविन माझा सुखी माणसाचा सदरा पाहुन

कोडे सग्यासोयर्याना पडायचे

सदरा माझा फाडण्यास नवनविन शक्कल काढायचे


शरीरावरचा सदरा ते फाडत चिंध्या करत होते

पण माझे भान होते कुठे शरीरावरचा सदरा पाहण्यात?

मी तर तल्लीन होतो हरीनाम घेण्यात!!!


माझा सुखी माणसाचा सदरा

असे नेहमी माझ्यापाशीच...माझ्याचपाशी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy