माझा भाऊराया
माझा भाऊराया
तुझे माझे अतूट नाते,
सदा गोडवे तु़झेच गाते
रूसणे- फुगणे तुझ्याचपाशी,
तूच सुख-दुःखाचा साक्षीदार असशी
नाही आपुले नाते रक्ताचे,
विणले अतूट धागे हे प्रेमाचे
भेटीगाठी नाही परी,
साद घालीता धावून येशी
अस्तित्व तुझे भासिते पदोपदी,
निराकार,सगुण रूप भाविते निशिदिनी
सर्व विश्वाचा तारणहार,
कृपाळू उदार माझाच भाऊराया
औक्षण करीते माझ्या जीवलगाचे,
अंतर देऊ नको ह्या वेड्या बहिणीसी ,
तुझ्यावरी ओवाळीते मायाही भाबडी
