STORYMIRROR

Darshana Prabhutendolkar

Classics Fantasy Inspirational

4  

Darshana Prabhutendolkar

Classics Fantasy Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
342

स्वप्नांची दुनिया न्यारी,

निराशेचे मेघ जाती परतूनि

चिंब भिजवूनी मनोमनी,

बरसात होते सुखाची

बेरंगी आयुष्याला सोबत मखमली स्वप्नांची

प्रारब्धाचे भोग सुटले नाही कोणासी

हतबल होऊनी का घोर लावावा जिवासी ?

आयुष्य हे अडथळ्यांच्या शर्यतीचे,

जिंकेल शर्यत तो असती किमयागार

पहावी स्वप्ने उत्तुंग शिखरे गाठण्याची,

उणीव नाही तया कसली, साथ तयाला निर्धाराची

स्वप्नांची दुनिया न्यारी,

भेट होते आप्तेष्टांची सोडून गेले दूर जरी,

देई एक दिलासा मनी पुनर्भेट घडवूनि परी

स्वप्नांची दुनिया न्यारी,

लटका राग विरून जाई,

अबोला ही क्षणभर राही

रूसवा-फुगवा पळीभरचा,

दूर देशी आहे जिवलगा

स्वप्नांची दुनिया न्यारी,

मनी असे ते स्वप्नी दिसे,

सत्य आहे हेच खरे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics