STORYMIRROR

Darshana Prabhutendolkar

Abstract Classics Others

3  

Darshana Prabhutendolkar

Abstract Classics Others

साठवणीतील आठवणी

साठवणीतील आठवणी

1 min
188

मेघ दाटूनि आले अंबरी,

बरसूनी गेल्या पर्जन्यसरी

 

कातरवेळी दाटीले अश्रू नयनी, 

आठवणींच्या हिंदोळ्यानी आले गहिवरूनी

 

स्मृतिपटलावर धूसर झाल्या,

परी आज नव्याने पुन्हा उमगल्या

 

आठवणींचा गंध दरवळला आसमंती,

उधाण आले आनंदासी

 

प्रतिबिंब  दिसले आयुष्याचे,

सोनेरी क्षणांच्या साक्षीचे

 

 लपंडाव पाहुनी सुखदुःखाचा,

 अर्थ नव्याने गवसिला जगण्याचा

 

जीवन गाणे गाता गाता ,

मोत्यांच्या सरी बरसून गेल्या

 

थकलेल्या मनास विरंगुळा आठवणींचा,

रिता झाला घडा परी दाविला मार्ग उमेदीचा

 

सखेसोबती आठवणींचे,

साक्षीदार  सरत्या काळाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract