गाणे निसर्गाचे
गाणे निसर्गाचे
अंगाची झाली लाही लाही,
अंत नको पाहू आता,
वरूण राजा तू बरसशील कधी ?
मोत्यांच्या सरी बरसून जाती,
आनंदाचे डोही मन न्हाऊन जाती
हिरवा शालू नेसून नटली,
धरणीमाय अंतरी सुखावली
थेंब टपोरे पडती पर्णांवर,
शहारून गेले खग हे अबोल,
चाहूल लागुनी फुटे कंठ मंडूकासी,
फुलवुनि पिसारा लोभस नर्तन करी मयुर
घन ओथंबून येती,
बळीराजासी सुखावून जाती,
आनंदाश्रू नयनी ओघळती
गर्जत येता मेघ अंबरी,
रोमांचली अवघी वसुंधरा गोजिरी
कडकडाट विजांचा थरार क्षणभर,
बिलगती लेकुरे थरथरून मायेच्या कुशीत
दुथडी भरून वाहता झाले मिलन
सरितेचे सागराशी,
प्रकोप झाला निसर्गाचा म्हणूनि
ढाळी आसवे मानव
मुलांसी आनंद पावसात खेळण्याचा,
तरूणाईला आनंद जादुई पावसात चिंब भिजण्याचा,
आठवणींचा सारीपाट रंगतो चहाच्या टपरीवर,
वाफाळलेल्या चहाला सोबत मातीच्या सुगंधाची
बरसल्या श्रावण सरी ,
छेडील्या मनीच्या तारा चिंब भिजवूनी
