स्त्री
स्त्री
भातुकलीच्या खेळात भावविश्व छकुलीचे,
अन् बाहुला-बाहुली सोबती बालपणीचे
लक्ष्मी येती घरा तिच्या पदस्पर्शाने,
अल्लड, अवखळ ती लेक लाडकी
उणीव नाही तिच्यात कसली,
भेटले वरदान सामर्थ्याचे जन्मसमयी
कोण तुम्ही देणार तिजला दुजाभाव समाजात?
स्थान तिचे अढळ जिवलगांच्या ह्रदयात
भ्रमनिरास होईल तुमचा,
डिवचाल तिला कधी तुम्ही.
कमजोर नाही, शक्तिमान ती
शौर्याचे मुर्तिमंत प्रतिक ती
प्रेमाचा अथांग सागर ती,
दयावान नाही तिच्या परी जगतात कुणी
केला संघर्ष तिने जीवनात नेहमी,
अस्तित्व तिचे मिटवू नका कधी
सन्मानाची हकदार नेहमी,
उपेक्षा करू नका कधी
स्त्री आहे जगतात म्हणूनि,
अस्तित्व तुमचे आहे बाकी
सन्मान कराल तिच्या सामर्थ्याचा तेव्हा,
सन्मान होईल तुमचा परी
संसाराच्या रथाची दोन समान चाके तुम्ही,
आणि सारथी तुम्ही
संसारवेलीवरचे पुष्प घेईल भरारी आकाशी,
वंशाचा दिवा लाडकी माझी म्हणून मिरवाल तुम्ही
