STORYMIRROR

Darshana Prabhutendolkar

Abstract Others

2  

Darshana Prabhutendolkar

Abstract Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
102

माझी ओळख

मी आणि माझे अस्तित्व.


लढा माझा स्वतःशीच


समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेला,

गरज आहे आधुनिक विचारसरणीची.


न्यूनगंड का बाळगावा,

असू आम्ही थोडे वेगळे.


प्रगल्भ आमुचे विचार असता,

का तमा बाळगावी समाजाची ?

 

उणे काही नाही असता,

उपेक्षा मात्र पदरोपदरी.


असू आम्ही थोडे वेगळे,

सन्मानाचे हकदार आम्ही.


जन्माचा अधिकार नव्हता अमुच्या हाती,

जगण्याचा समान हक्क हिरावणे नाही तुमच्या हाती.

उपरोधिक बोल येता कानी पदोपदी,

लाही होते अंगाची.


गरज आहे बदलाची,

समाजाने स्वीकारण्याची.


असू आम्ही थोडे वेगळे,

उत्तुंग भविष्याची स्वप्नपूर्ती

होईल साध्य लवकरी.


असू आम्ही थोडे वेगळे,

शल्य नाही मनी कसले.

परी उपरा म्हणूनि कटाक्ष टाकिता,

सल बोचरी लागे जिव्हारी.


गडद अंधाराचे मेघ परतुनी,

उषःकाल होतोच नक्की.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract