लेक
लेक
"लेक जगवा-लेक शिकवा"
तिला जगविल-शिकविल कोण..?
दुजा भाव ठेऊ नका
दुखावते हो तिचे मन..!
जगवून-शिकवून लेकीला
देऊ सुसंस्काराचे धडे..
उद्याची जिजाऊ ती
फुलविल चैतन्याचे मळे..
सावित्रीची उपासक लेक
हवा तिला थोडा आधार..
खांद्याला खांदा लावून
उचली कुटुंबाचा भार..
हौशीनं- प्रेमानं शिकवू
आपल्या पोटच्या लेकीला..
शिवाजी-फुले- शाहूंच्या
जपून ठेऊ नेकीला..
मुलगा- मुलगी भेद कशाला
दोघेही आनंदाचे देणे..
लेकीला जगवून-शिकवून
बनवू या नक्षत्रांचे लेणे..
