STORYMIRROR

Kothekar yogita Sanjay Kothekar

Inspirational

3  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Inspirational

लेक चालली सासरला

लेक चालली सासरला

1 min
2.3K


लेक चालली सासरला

बापाची ती स्वप्न परी

प्राणपणाने जपले तरी

विश्वासाने सोपवितो तिज

एक नव्या अनोळखी घरी ॥


आईची ती बाहुली सुंदर

संस्कार तिजवरी ती करीतसे

लाडाची अशी नाजूक पणती

दोन्ही घरी प्रकाशतसे ॥


अशी लेक चालली सासरला

सांकव बनूनी दोन्ही घरची

नव्या नात्यांना सांधायला

उधळण करण्या आंनदाची ॥


लेक असे ईश्वराचे लेणे

तरीही सासरी अवहेलना

हुंडयापायी का खुडल्या जाती

कित्येक लेकींना सांगा ना !


लेक असते चैतन्य घराचे

ठाऊक असूनही लोकाना

तरी मग का नष्ट न करिती

दुष्ट अशा या पंरपरांना ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational