कविता
कविता
शब्दाशी शब्द गुंतत गेलो, तशी तू बनत गेलीस.
अविरत भावना मनातल्या, कागदावर मांडत गेलीस.
सगळे अलंकार भाव रस, तू धारण केलेस.
अनेक विचारांचे विचार, तू थोडक्यात विणलेस.
सगळ्यांसाठी तू बनलीस, आज तुझ्यासाठीच तुला बनवतोय.
तुझ्याशी जोडलेल नात, मांडण्याचा अट्टाहास करतोय.
वर्णन तूझ करण्यासाठी, तूझाच सहारा घेतोय.
शब्दांचे अमृत तूझ्या, तूझ्यासोबतच पीतोय.
प्रयत्न केला तुला बनवण्या, नाव न घेता.
आयुष्य म्हनजे दुसर तिसर काय, आहे एक कविता.
