STORYMIRROR

Shekhar Chorghe

Inspirational

2  

Shekhar Chorghe

Inspirational

कविता फक्त तुझ्यासाठीच

कविता फक्त तुझ्यासाठीच

1 min
14.1K


तुझ्या सोबतीनं जगायचा होता 

कारण चेह-यात तुझ्या मी 

आज चंद्र पाहिला होता 

म्हणूनच तिला म्हटलं 

आज साथ देशील का?

तुझं माझं प्रेम 

थोडं जास्त बहरू देशील का?

त्यावेळी तिच्या ओठांवर 

आनंद कठोकाठ भरलेला असायचा

ते पाहून ओठांवर माझ्या 

काव्याचा वसंत फुलायचा 

तेव्हा तिला म्हणालो 

तू हसलीस काव्य कळले 

तू वदलीस शब्द फुलले 

तू मांडली ती कविता झाली 

तू गायली ती गझल निराळी 

मग ती म्हणाली 

शब्दांना काव्यात गुंफण्याची 

तुला भलतीच सवय जडली 

माझ्यावरची तुझी कविता 

अता चांगलीच फुलू लागली 

मग तिला म्हणालो 

तू खूप सुंदर आहेस 

कोणालाही तुझ्यावर प्रेम करावसं वाटेल 

अन् रेखताना ते प्रेम 

प्रत्येकाच्या ओठांवर नवं काव्य दाटेल

मग ती म्हणाली 

माझ्यावरची तुझी कविता 

मला कधीच कळत नाही 

तुझ्या काव्यात लपलेलं माझे लावण्य 

कधीच कुणाला दिसत नाही 

शेवटी तिला म्हणालो 

काव्यात लपलेलं तुझं लावण्य

शब्दांनादेखील दिसत नाही 

ती कविता फक्त तुझ्यासाठीच असते 

ती वाचून प्रत्येकाला समजतेच असे नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational